Notifications

लोकशाहीचा नकली टेंभा मिरवणारे पक्षाध्यक्ष; भाजपचा राज ठाकरे यांच्यावर निशाणा

By PCB Author

April 20, 2019

मुंबई, दि. २० (पीसीबी) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीकेची झोड उठवली असतानाच शनिवारी भाजपानेही मनसेवर ट्विटरवरुन पलटवार केला आहे. दिवसाढवळ्या मराठी तरुणांना मारहाण करणारे कार्यकर्ते आणि रात्री सभांमधून लोकशाहीचा नकली टेंभा मिरवणारे पक्षाध्यक्ष, अशा शब्दात भाजपाने मनसेचा समाचार घेतला आहे.