Maharashtra

लॉकडाऊन ३० पर्यंत, काय बंद, काय सुरू ते ठरले – मुख्यमंत्री काय बोलणार याकडे जनतेचे लक्ष

By PCB Author

April 13, 2021

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रा. ७ ते ८ च्या दरम्यान फेसबूकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. नियमावली ठरली आहे. १५ ते ३० एप्रिल पर्यंत निर्बंध कायम राहतील. १ मे पासून लॉकडाऊन खुला करण्यास सुरवात होईल. आताचा लॉकडाऊन हा गेल्या वर्षीसारखे नसेल, असे सुत्रांकडून सांगण्यात आले. नागरिकांची गैरसोय होणार नाही, छोटे व्यावसायिक, कष्टकरी यांना दिलासा देण्याचाही राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.

१) शाळा, कॉलेजेस बंदच राहणार २) जिम, जलतरण तलाव, चित्रपटगृह बंदच राहणार ३) बस, रिक्षा वाहतूक सुरू राहणार – पाससेची गरज नाही ४) गरजेची ऑफिसेस सुरू राहतील ५) फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू राहणार ६) मेडिकल सुविधा वाढवणार ७) मजदुरांना पॅकेज मिळणार ८) हॉटेल, रेस्टॉरंड बंद, पण होम डिलिव्हरी सुरू राहिल ९) विकेंड लॉकडाऊन सारखाच १५ दिवसांचा असेल