लॉकडाऊनमुळे १ हजार ८८५ कोटी रुपये परत करावे लागले ..

0
294

प्रतिनिधी,दि.४ (पीसीबी) : कोरोनाचे संकट रोखण्यासाठी अचानकपणे संपूर्ण देशात २५ मार्च पासून लॉकडाऊन लागू करण्यात आले. खाजगी वाहतुकीसह सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतुकीवर बंदी घालण्यात आली. रेल्वे सेवा देखील बंद करण्यात आली. परंतु लॉकडाऊन पूर्वी प्रवाश्यांनी मोठ्याप्रमाणात रेल्वे रिजर्वेशन केले होतो. सर्व ट्रेन रद्द केल्यामुळे रेल्वे विभागाला यात्रेकरूंचे तब्बल १ हजार ८८५ कोटी रुपये परत करावे लागले आहेत.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. २५ मार्च रोजी देशभरात लॉकडाऊन घोषित केले. अचानकपणे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. देशांतर्गत असलेली विमान सेवा, रेल सेवा व सर्व प्रकारच्या सार्वजनिक व खाजगी वाहतूक लॉकडाऊन काळात पूर्णपणे बंद करण्यात आले. सर्व ट्रेन रद्द झाल्याने रेल्वेचे आगाऊ रिजर्वेशन केलेल्या प्रवाश्यांचे पैसे परत करण्याचे मोठे आवाहन रेल्वे विभागासमोर आले. २१ मार्च ते ३१ मे दरम्यान ऑनलाईन पद्धतीने बुक केलेल्या तिकिटांचे पैसे रेल्वे विभागाने परत केले आहेत. ज्या खात्यावरून तिकिट बुक करण्यात आले त्याच खात्यावर तिकिटांचे पैसे वर्ग करण्यात आले आहेत. तसेच पैसे परत करताना कसल्याही प्रकारचे शुल्क कापण्यात आलेले नाही. आत्तापर्यंत सुमारे १ हजार ८८५ कोटी रुपये परत करण्यात आले आहेत. थेट खात्यात पैसे परत केल्यामुळे प्रवाश्यांना रिफंडसाठी कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही.