लॉकडाऊनच्या भीतीने झालेल्या गर्दीतून मोठ्या प्रमाणावर रुग्णांची संख्या वाढली – छगन भुजबळ

0
247

मुंबई,दि.१८(पीसीबी) – ज्या ठिकाणी लॉकडाऊन नव्याने सुरू करण्यात आले आहेत या ठिकाणी देखील कोरोनाची साखळी तुटलेली नसून उलटपक्षी लॉकडाऊनच्या भीतीने झालेल्या गर्दीतून मोठ्या प्रमाणावर रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. अर्थचक्र नव्याने सुरू करण्यात अनेक अडचणी येतात त्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागणार आहे असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

राज्यात जशी कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागली तसतसं काही शहरांमध्ये शासनाने पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याच्या निर्णय घेतला. याच पार्श्वभूमीवर आता लॉकडाऊनचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल, असा सावध इशारा भुजबळ यांनी दिला आहे.

दरम्यान लॉकडाऊन करण्याची अनेक नागरिक मागणी करू लागले आहेत तर लॉकडाऊन करू नये अशीही अनेक नागरिकांची मागणी आहे. लॉकडाऊन किती वेळा करावा हा मोठा प्रश्न शासन आणि प्रशासनासमोर उभा असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं.