लॉकडाउनदरम्यान कोणकोणत्या सुविधा सुरू राहणार हे जाणून घ्या…

0
503

दिल्ली, दि.२४ (पीसीबी) –  लॉकडाउनदरम्यान ह्या सुविधा सुरू राहणार

१) खाद्य पदार्थ, किराणा, दूध, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस, मासे यांची विक्री, वाहतूक आणि साठवण

२) किमान मनुष्यबळासह बॅंका/ एटीएम, भारतीय रिझर्व्ह बँक, फिन्टेक सेवा (स्टॉक एक्सचेंज, क्लीअरींग ऑपरेशन्स, म्युच्अल फंडस, स्टॉक ब्रोकर्स) अन्य संबंधित सेवा, विमा, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, कॅश लॉजिस्टिक आणि कॅश ट्रान्झॅक्शन कंपन्या

३) प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया

४) टेलिकॉम, टपाल, इंटरनेट, डेटासेवा यांसह माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सेवा.

५) बेकरी आणि पाळीव प्राण्यांसाठीचे खाद्यपदार्थ आणि पशुवैद्यकीय सेवा

६) शेतमाल आणि अन्य वस्तूंची निर्यात आणि आयात

७) खाद्य पदार्थ, औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यांसह अत्यावश्यक वस्तूंचे ई-कॉमर्सद्वारे वितरण

८) उपाहारगृहांमधून घरपोच सेवा

९) रुग्णालये, औषधालये आणि चष्म्याची दुकाने, औषधांचे कारखाने, विक्रेते आणि वाहतूक

१०) टँकर्सदवारे पाणी पुरवठा करणाऱ्या सेवा

११) पेट्रोल पंप, एलपीजी गॅस, ऑईल एजन्सीज त्यांची साठवण आणि त्यांच्याशी संबंधित वाहतूक व्यवस्था