लैंगिक छळाच्या आरोपामागे शक्तिशाली लोकांचा हात – सरन्यायाधीश रंजन गोगोई

0
456

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – सर्वोच्च न्यायालयातील एका  निवृत्त कनिष्ठ महिला कर्मचाऱ्याने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला  आहे. हे आरोप सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी  फेटाळून लावले आहेत.  न्यायपालिकेचे स्वातंत्र्य धोक्यात असून महिलेच्या मागे काही शक्तिशाली लोकांचा हात असावा, असे त्यांनी म्हटले आहे.

सरन्यायाधीश म्हणाले, २० वर्ष न्यायपालिकेत नि:स्वार्थ सेवा केल्यानंतर माझ्या बँकेत ६ लाख ८० हजार रुपये जमा आहे. पीएफ खात्यात ४० लाख रुपये आहेत. काही शक्तींना माझ्याविरोधात काहीच मिळत नसल्याने त्यांनी आता एका महिलेचा आधार घेत माझ्यावर आरोप केले. या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी निर्णय देणे टाळले. तर अन्य न्या. मिश्रा आणि न्या. खन्ना यांनी माध्यमांनी जबाबदारीने वागावे, असे सांगितले. सत्यतेची पडताळणी केल्याशिवाय माध्यमांनी महिलेच्या आरोपांना प्रसिद्धी देऊ नये, असेही त्यांनी  म्हटले आहे.

प्रसारमाध्यमांनी महिलेच्या आरोपांना प्रसिद्धी देताना संयम बाळगावा, असे आवाहनही केले आहे. महिलेच्या आरोपांची शहानिशा न कता बातम्या देण्यामुळे न्याययंत्रणेचे स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकते, अशी भीतीही न्यायालयाने व्यक्त केली आहे.