Desh

लैंगिक शोषणाचे आरोप; एम.जे.अकबर यांना तातडीने भारतात परतण्याचे आदेश

By PCB Author

October 11, 2018

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – ‘मी टू’ मोहीम अधिक तीव्र झाल्यानंतर अनेक महिलांनी परराष्ट्र राज्यमंत्री  एम.जे.अकबर यांच्यावर  लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. त्यानंतर त्यांच्यासमोरील अडचणीत वाढ  झाली आहे. याप्रकरणी केंद्र सरकारने त्यांना नायजेरिया दौऱ्यावरून तातडीने आज (गुरूवार)  भारतात परतण्याच्या सुचना दिल्या आहेत. 

अनेक वृत्तपत्रामध्ये संपादक असताना लैंगिक शोषण केल्याचा आरोप या महिलांनी अकबर यांच्यावर केला आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणावर सरकार आणि पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची चर्चा सुरू आहे. मात्र, या प्रकरणी अकबर यांनी खुलासा करणे महत्त्वाचे आहे.

काही तक्रारी गंभीर स्वरुपाच्या आहेत, त्यावर विचार केला जात आहे. तर राजकीय पक्ष आणि पत्रकारांमध्ये अकबर यांच्याविरोधात बनत असलेले मत पक्षासाठी चिंतेचा विषय आहे, असे भाजपच्या एका नेत्याने नांव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.