Bhosari

लेवापाटीदार समाजाचा भोसरीत गुरूवारी वधू-वर मेळावा

By PCB Author

October 16, 2018

भोसरी, दि. १६ (पीसीबी) –  समता भ्रातृ मंडळाच्या वतीने आंतरराष्ट्रीय लेवापाटीदार समाजाचा वधू-वर मेळावा गुरूवारी (दि.१८) भोसरीतील अंकुशराव लांडगे सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत होणार आहे.

या मेळाव्यासाठी नोंदणीची अंतिम तारीख १८ ऑक्टोंबररोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत राहील. या मेळाव्यासाठी ऑनलाईन नोंदणी www.samatabhrat@mandal.com या वेबसाईटवर करण्यात यावी. अधिक माहितीसाठी ९८५००३५८१७, ९९२२०२०७००, ९८५०७५१३७० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.