लेबनानची राजधानी बेरुत दोन भयानक स्फोटांमुळे हादरली; कसा झाला स्फोट ?

0
236

बेरुत,दि.५(पीसीबी) – लेबनान देशाची राजधानी असलेल्या बेरुत शहरात मंगळवारी (4 ऑगस्ट) दुपारच्या सुमारास मोठा आवाज झाला. हा आवाज कशामुळे झाला हे समजण्यापूर्वीच एक स्फोट झाला. त्यानंतर काही मिनिटानंतर दुसरा स्फोट झाला. जवळपास 15 मिनिटात एकमागोमाग एक दोन स्फोट झाले. याचा आवाज एखाद्या बॉम्बस्फोटप्रमाणे होता. या स्फोटामुळे जमिनीला तडे गेले. गगनचुंबी इमारती जमीनदोस्त झाल्या. अनेक इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.

दरम्यान या घटनेनंतर राष्ट्रपती मायकल आऊन यांनी आपत्कालीन बैठक बोलवली आहे. या बैठकीत आरोग्यमंत्री हमाद हसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत अनेक लोक जखमी झाले आहेत. तसेच शहराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शहरातील सर्व रुग्णालयांनी जखमींवर उपचार करण्यासाठी तयार रहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.