Pune

लेकीवरील प्रेमामुळे शरद पवारांनी पार्थ पवारांना मावळात ढकलले – चंद्रकांत पाटील

By PCB Author

April 02, 2019

पुणे, दि. २ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जर नातवाला खासदार करायचे होते. तर त्यांना बारामतीतून उमेदवारी का नाही दिली ? असा सवाल करून  पवारांचे नातवापेक्षा लेकीवर जास्त प्रेम आहे. त्यामुळे त्यांनी पार्थ पवारांना मावळमध्ये ढकलून दिले आहे, अशी टीका  महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारानिमित्त आयोजित केलेल्या जाहीर सभेत पाटील बोलत होते. या सभेत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

दरम्यान, मंत्री पाटील शरद पवार यांना सातत्याने लक्ष्य करत आहेत. पवारांनी वय झाल्याने आता निवडणुकीतून माघार घ्यावी, असा खोचक सल्ला त्यांनी दिला होता. आता आपल्या भाषणात बोलताना पवारांनी कमी बोलावे, असा सल्लाही पाटील यांनी दिला आहे.