लालू यादव यांना जामिन मिळाला मात्र तुरुंगातच रहावे लागणार

0
410

झारखंड, दि. १२ (पीसीबी) – बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना झारखंड हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. चारा घोटाळ्यातील एका देवघर कोषागार प्रकरणात त्यांना हायकोर्टाने आज (शुक्रवार) जामीन मंजूर केला. ही दिलासा देणारी गोष्ट असली तरी त्यांना दुसऱ्या एका प्रकरणात जामीन मिळाला नसल्याने तुरुंगातच रहावे लागणार आहे.

चारा घोटाळ्यातील देवघर कोषागार प्रकरणी शिक्षेचा अर्धा काळ संपल्याचे कारण सांगत लालू प्रसाद यादव यांच्यावतीने झारखंड हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने यादव यांना ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. तसेच कोर्टाने लालू प्रसाद यादव यांना आपला पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, चाईबासा-दुमका कोषागार प्रकरणी त्यांना अद्याप जामीन मिळू शकलेला नाही. त्यामुळे त्यांना तुरुंगातच रहावे लागणार आहे.