लालू प्रसाद यादव यांच्या निवास, कार्यालयावर पुन्हा सीबीआयचे छापे

0
362

पाटणा, दि. २० (पीसीबी) : राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांच्या १५ ठिकाणी सीबीआयच्या वेगवेगळ्या पथकांनी छापे टाकले. शुक्रवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. इतकंच नाहीतर एक टीम १० सर्कुलर रोड इथंही पोहोचली आहे. जे राबडी देवी यांचे अधिकृत निवासस्थान आहे. तिथेही पथक तपास करत असल्याची माहिती आहे. राबडी निवासस्थानी पोहोचलेल्या सीबीआयच्या टीममध्ये महिला आणि पुरुष दोघांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. सीबीआयच्या या पथकात एकूण १० लोक आहेत जे राबरी निवासस्थानी चौकशी करत आहेत. यावेळी कोणालाही घरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

राबरी निवासस्थानावर छापा टाकण्याबाबत सीबीआयचे अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाहीत. पण हाती आलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, हे प्रकरण रेल्वे भरतीशी संबंधित आहे. जेव्हा लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री होते. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

एएनआय वृत्तसंस्थेनुसार, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने आरजेडी सुप्रीमो लालू यादव आणि त्यांच्या मुलीविरोधात भ्रष्टाचाराचा नवीन गुन्हा दाखल केला आहे. लालू यादव यांच्या या नव्या प्रकरणासंदर्भात दिल्ली आणि बिहारमधील एकूण १७ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.