Maharashtra

‘लालबागचा राजा’ मंडळावर सरकारी नियंत्रण; भाजप सरकारने हे उद्योग थांबवावे- राहुल शेवाळे

By PCB Author

October 16, 2018

मुंबई, दि.  १६ (पीसीबी) – ‘लालबागचा राजा’ गणपती मंडळावर सरकारी नियंत्रण आणण्याचा धर्मादाय आयुक्तांनी घातलेला निर्णय चुकीचा आणि एककल्ली आहे. मंडळाच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याची भाषा करणाऱ्या धर्मादाय आयुक्तांचा ‘बोलविता धनी’ नेमका कोण?  असा सवाल करून शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी  आयुक्तांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

हिंदूंच्या सणांना आडकाठी करू नये. भाजप सरकारने चालविलेले हे नसते उद्योग त्वरित थांबवावे, असा इशाराही शेवाळेंनी यावेळी दिला.

दरम्यान, लालबागचा राजा गणेश मंडळावर नियंत्रण ठेवण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती दर्शन रांगेबाबात धोरण ठरवणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची मुजोरी, व्हीव्हीआयपींची अरेरावी आणि त्यामुळे सर्वसामान्य भाविकांना होणार त्रास थांबण्याची शक्यता आहे. लालबागच्या राजाच्या चरणी दान करण्यात येणाऱ्या पैसे, दागिने आणि मौल्यवान गोष्टींची मोजदाद धर्मादाय आयुक्तांच्या देखरेखीखाली करण्यात येणार आहे. या दानाची मोजदाद धर्मदाय आयुक्तलयाचा प्रतिनिधीसमोर होणार आहे.