लालकृष्ण अडवाणी आमचे प्रेरणास्थान, त्यांचे तिकीट कापलेले नाही – नितीन गडकरी  

0
853

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या ऐवजी गांधीनगर मतदार संघातून राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, अडवाणींचे तिकीट कापलेले नाही. तर त्यांचे वय आणि तब्बेतीच्या कारणास्तव संसदीय बोर्डाने त्यांना उमेदवार दिलेली नाही. अडवाणी आमचे प्रेरणास्थान आहेत, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.  

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने  गुरुवारी  १८४ उमेदवारांची पहिली  यादी जाहीर केली. यात भाजपचे ज्येष्ठ नेते  लालकृष्ण आडवाणी यांच्या ऐवजी गांधीनगर मतदार संघातून राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपमध्ये अडवाणी पर्वाचा अस्त झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत गडकरी म्हणाले की, पक्षातील प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल आदर असून तिकीट कापले म्हणून त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष होऊ शकत नाही. प्रत्येक पक्षात परिवर्तन होत असते आणि हा त्याचाच एक भाग आहे. वाढते वय आणि तब्बेतीच्या कारणामुळे संसदीय बोर्डाने लालकृष्ण आडवाणी यांना तिकीट न देण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी  सांगितले.