Pimpri

लायन्स क्लब पुणे निगडीच्या अध्यक्षपदी निंबाळकर

By PCB Author

August 09, 2019

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – लायन्स क्लब ऑफ पुणे निगडीच्या अध्यक्षपदी सविता निंबाळकर तर सचिवपदी मंजिरी कुलकर्णी, खजिनदारपदी शिवकन्या मुसमाडे यांची निवड करण्यात आली.

आकुर्डी येथे पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात माजी प्रांतपाल गिरीश मालपाणी यांनी नवीन पदाधिकाऱ्यांना २०१९-२० या कार्यकालासाठी शपथ दिली. या प्रसंगी प्रांतीय कायमस्वरूपी प्रकल्पाचे संचालक संजय निंबाळकर, माजी अध्यक्ष जनार्दन गावडे, कौशल्य विकास प्रकल्प प्रमुख अशोक येवले, हरिदास नायर, चंद्रशेखर पवार आदी उपस्थित होते.

वर्षभरात आरोग्य, पर्यावरण, रक्तदान, नेत्रदान, रस्ते वाहतूक, अंध अपंगांसाठी भरीव कार्य केले जाणार आहे. तसेच कौशल्य विकास अंतर्गत चिंतामणी रात्र प्रशालेच्या मुलांना रोजगार मिळण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाईल. आदिवासी भागातील कुपोषित बालक व मातांसाठी आहार योजना व महिलांना शिलाई मशिनचे प्रशिक्षण देवून मशीनचे वाटप केले जाणार असल्याचे अध्यक्षा निंबाळकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिनांजली मोहिते तर आभार सलीम शिकलगार यांनी मानले.