Maharashtra

लातूरमध्ये खंडणी प्रकरणी काँग्रेस नगरसेवकाला अटक

By PCB Author

December 28, 2018

लातूर, दि. २८ (पीसीबी) – खासगी शिकवणीच्या दोघा संचालकांचे अपहरण करुन त्याच्याकडे खंडणीची मागणी केल्याने लातूरातील काँग्रेस नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे.

सचिन मस्के असे अटक करण्यात आलेल्या काँग्रेस नगरसेवक नाव आहे. याप्रकरणी अध्ययन कोचिंग क्लासचे संचालक विजयसिंह परिहार आणि राजू तिवारी यांना पोलीसात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस नगरसेवक सचिन मस्के लातूर शहरातील अध्ययन कोचिंग क्लासचे संचालक विजयसिंह परिहार आणि राजू तिवारी यांना पैशासाठी धमकी देत होता. याआधी त्याने त्यांच्याकडून सहा लाख रुपयेही वसूल केल्याचे परिहार आणि तिवारी यांनी पोलिसांना सांगितले आहे. मात्र आणखी पैशांसाठी सोमवार (दि.१०) डिसेंबर रोजी त्या दोघांचे राहत्या घरातून अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांना मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देऊन सोडण्यात आले. भयभीत झालेल्या विजयसिंह परिहार यांनी काल रात्री लातूर पोलिसात याबाबत तक्रार केली. परिहार यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ सूत्रे हालवत काँग्रेस नगरसेवक सचिन मस्केला अटक केली. या गुन्ह्यात आणखी एक काँग्रेस नगरसेवक आणि जिल्हा स्तरावरील एका संघटनेचा संस्थापक अध्यक्ष असल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस या दोघांचा तपास करत आहेत.