लांडेवाडीत पाण्याच्या मोटारीचा जबरदस्त शॉक लागून विवाहितेचा मृत्यू

0
1127

भोसरी, दि. ८ (पीसीबी) – पाण्याच्या मोटारीचा शॉक लागून एका २४ वर्षीय विवाहित महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज (सोमवार) पहाटे सहाच्या सुमारास लांडेवाडी भोसरी येथे घडली.

भाग्यश्री योगेश जाधव (वय २४, रा. लांडेवाडी, भोसरी) असे मृत महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे सहाच्या सुमारास पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी भाग्यश्री गेल्या होत्या. यावेळी त्यांना मोटारीचा जबरदस्त शॉक लागला. या घटनेमध्ये त्या गंभीर भाजल्या गेल्या. त्यांना तात्काळ पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.