Maharashtra

लस शोधण्यात दुसऱ्या कंपनीलाही यश

By PCB Author

July 03, 2020

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – : देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. अशातचं कोरोना संसर्गावर लस शोधण्याचं कामही युद्ध पातळीवर सुरू आहे. यात दोन कंपन्यांना यश आले आहे. भारत बायोटेक या कंपनीच्या Covaxin पाठोपाठ आता अहमदाबाद येथील झायडस कॅडीला हेल्थकेअर या कंपनीने तयार केलेल्या लसीच्या मानवी चाचणीला डीसीजीआयकडून परवानगी देण्यात आली आहे.

अहमदाबाद येथील झायडस कॅडीला या कंपनीनेही कोरोना संसर्गावर लस तयार केली आहे. त्यामुळे या कंपनीला देखील मानवी चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. प्राण्यांवरील चाचणी यशस्वी झाल्यानंतर आता या कंपनीला आयसीएमआरने मानवी चाचणी करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे मानवी चाचणी करण्यासाठी परवानगी मिळालेली झायडस कॅडीला ही दुसरी कंपनी आहे.

भारत बायोटेकची लस ऑगस्टपर्यंत येण्याचा अंदाज भारतात कोरोनावर लस शोधण्यात येत असून भारतीय औषधी महानियंत्रक (डीसीजीआय) ने मानवी चाचणीसाठी परवानगी दिली आहे. ‘कोवॅक्सिन’ नावाची लस भारत बायोटेकने इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही)सोबत एकत्र येऊन तयार केली आहे. ही लस ऑगस्टपर्यंत येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कशी तयार होते लस? कोणतीही लस ही मानवी चाचणीमध्ये तीन टप्प्यांमधून जाते. यामध्ये पहिला टप्पा हा अगदीचा ठराविक लोकांसाठी असतो. यामध्ये लसीची मानवी शरीरावर चाचणी करून त्याचा प्रभाव पाहिला जातो. फेझ दोन मध्ये मिडस्केलमध्ये अंदाजे शेकडो लोकांवर लस देऊन त्याची मात्रा अणि परिणाम पाहण्यासाठी चाचणी केली जाते. तर फेझ 3 मध्ये बहुसंख्य लोकांवर रॅन्डम टेस्ट केल्या जातात. त्याचे अहवाल तपासून पाहून पुढील निर्णय घेतला जातो.