Desh

लस खरेदी न करण्याचे बिहारचे संकेत

By PCB Author

May 24, 2021

बिहार,दि.२४(पीसीबी) – लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासाठी अनेक राज्यांनी जागतिक निविदा मागवल्या आहेत. परंतु बिहार सरकारनं याच्या उलट निर्णय घेतला आहे.

जागतिक स्तरावर लस खरेदी करण्यासाठी जाण्याची शक्यता फार कमी असल्याचे संकेत बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडे यांनी दिले आहेत. त्यांनी एनडीटीव्हीशी बोलताना यावर भाष्य केलं.

“अन्य राज्यांनी जागतिक निविदा मागवल्या आणि त्याचे परिणाण काय आले ते पाहण्याची गरज आहे. आम्हाला १ कोटी १ लाख डोसेस मिळाले आहेत. रविवारपर्यंत ९८ लाख नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे,” असं ते म्हणाले होते.