Desh

लवकरच होणार आलिया भट्टहीचे युट्यूब चॅनल लाँच

By PCB Author

June 27, 2019

मुंबई, दि, २७ (पीसीबी) – आलिया भट्ट नेहमीच तिच्या ग्लॅमरस अभिनयाने आणि आदगीरीने तिच्या चाहत्यांना भुरळ घालत असते. आलिया तिच्या मेकअप, फॅशन, फिटनेस चांगलीच चर्चेत असते. लवकरच आलिया चा युट्यूब चॅनल लाँच होणार आहे. या चॅनलचे नाव सुद्धा ‘आलिया भट्ट’ असे असणार आहे.

‘आलिया भट्ट’ या चॅनलमध्ये कोणत्या विषयांचा समावेश असणार आहे या विषयाचा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘आलिया भट्ट’चा युट्यूब चॅनल लाँच दरम्यान ‘मला नेहमीच लोकांशी बोलायला आवडते त्यामुळे या माध्यमातून मी माझ्या फॅन्सशी संवाद साधणार आहे. त्यांना माझ्या आयुष्याबद्दल अधिक जाणून घेता येणार आहे’, असे मत आलिया भट्ट ने व्यक्त केले आहे.