Maharashtra

लवकरच येणार सनीचा बायोपिक

By PCB Author

July 06, 2018

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – अडल्ट चित्रपटांपासून ते बॉलिवूडच्या बेबी डॉलपर्यंत सनी लिओनीचा प्रवास फारसा सुकर वाटत असला तरीही तो तितका सुकर नव्हता हेच खरे. सनीच्या याच प्रवासावर आणि तिच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या, कधीही प्रकाशझोतात न आलेल्या प्रसंगावर उजेड टाकणारी एक बायोपिक वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’, असे या बायोपिक वेब सीरिजचे नाव असून, त्यातून बऱ्याच अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. त्यामुळे सध्या या सीरिजविषयी बरीच उत्सुकता आणि कुतूहल पाहायला मिळत आहे. या बायोपिकमध्ये सनीचा आतापर्यंतचा जीवनप्रवास उलगडणार असून, तिच्या तारुण्यावस्थेतील भूमिका साकारण्यासाठी रिसा सौजानी हिची निवड करण्यात आली आहे.

पॉर्न स्टार ते बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख करणारी सनी अनेकांसाठी नवी होती. पण, प्रेक्षकांनीही तिचा मोठ्या मनाने स्वीकार केला. वाटेत येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करत सनीने यश संपादन केले. आपल्या या प्रवासाविषयी वृत्तसंस्थेशी संवाद साधताना सनी म्हणाली होती, ‘अनेकांना असे वाटते की भारतात येण्याचा निर्णय घेतल्यानंतर लोकांनी माझा विरोध करण्यात सुरुवात केली. पण हे खरे नाहीये. वयाच्या २१व्या वर्षापासूनच मला घृणास्पद मेल येत होते. त्यामुळे मला होणाऱ्या विरोधाचा देशाची काहीच संबंध नाही. पण, हो यात समाजाची भूमिका आहे हेसुद्धा तितकच खरे. मुळात वयाच्या त्याच टप्प्यावर खऱ्या अर्थाने आपल्याला होणारा विरोध, इतरांकडून आपली घृणा केली जाणे हे काय असते याचा प्रत्यय मला आला होता.’ आपल्याला होणारा विरोध आणि शेलक्या शब्दांत होणाऱ्या इतरांच्या टीका पाहता तेव्हा आपण मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचल्याचंही तिने स्पष्ट केले.