Desh

लवकरच एक मोठा त्सुनामी येणार – राहुल गांधी

By PCB Author

March 18, 2020

दिल्ली, दि.१८ (पीसीबी) – भारताला केवळ कोरोनापासूनच धोका नसून एक मोठे असे त्सुनामी संकट भारताच्या तोंडासमोर आलेले आहे आणि हे आर्थिक संकट प्रचंड मोठे असून त्यासाठी आपल्याला तयार असणे गरजेचे आहे. संसद भवनाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधीं म्हणाले

पुढे बोलताना म्हणाले की, अंदमान निकोबारमध्ये त्सुनामी येण्यापूर्वी पाणी खाली गेले होते. अगदी तसेच आता सर्वकाही खाली गेलेय. लवकरच एक मोठा त्सुनामी येणार आहे, तसेच पुढे काय होईल, याबाबत सरकारला काहीच माहित नाही. मी पहिल्यापासूनच म्हणतोय, देशात आर्थिक त्सुनामी येणार आहे. मी सातत्याने याकडे लक्ष वेधत आहे, जाणीव करून देत आहे. मात्र, माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले जाते. सरकारकडून मूर्ख बनविण्यात येत आहे. पुढे आर्थिक स्थिती अतिशय खराब होणार आहे.तसेच, लोकसभेत अधिकारीक भाषेसंदर्भात प्रश्न विचारण्यास परवानगी नाकारल्याबद्दलही राहुल यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, हा तमिळनाडूच्या जनतेचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले.

आर्थिक संकटामुळे भारतीयांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे, असे मत काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे.