Maharashtra

लबाड राष्ट्रवादीन शब्द देऊन फसवल; हर्षवर्धन पाटलांचा राष्ट्रवादीवर निशाना

By PCB Author

September 04, 2019

पुणे, दि. ४ (पीसीबी) – लबाड राष्ट्रवादीने शब्द देऊन फसवल, आघाडीचा धर्म पाळूनही राष्ट्रवादीने अन्यायच केला. आमच्या सभ्यपणाचा फायदा राष्ट्रवादीने घेतला, अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी मनातली खदखद व्यक्त केली आहे. कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्यासाठी त्यांनी इंदापुरात मेळावा आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते.

सगळ्या जनतेच्या ज्या भावना आहेत, त्याच माझ्या भावना आहेत. तुमच्या भावनांचा आदर केला जाईल. ज्याचे जळत त्याला कळत, म्हणून आता पुढचा निर्णय घ्यावा लागेल, असे म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी पक्षांतराचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत. यामुळे हर्षवर्धन पाटील यांचा भाजपप्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. दहा तारखेनंतर ते पक्षांतराची घोषणा करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीसाठी प्रामाणिकपणे काम केले, पण काय मिळाले, असा सवाल त्यांनी व्यथित होऊन विचारला. आज सकाळी मेळाव्यापूर्वी हर्षवर्धन पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांची देखील भेट घेतली होती. यामुळे ते देखील विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांना मदत करतील अशी चर्चा आहे.