Maharashtra

लताजी भारताच्या शान आहेत – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

By PCB Author

August 18, 2019

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – राष्ट्रपती रामनाथ कोविंद महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज मुंबईत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी लताजी भारताच्या शान आहेत. त्यांच्या साधेपणाचा आमच्यासमोर नेहमीच आदर्श राहिला आहे, अशा शब्दात कौतुक केले.

राष्ट्रपतींनी आज सकाळी वर्ध्यातील पवनार आश्रमाला भेट देऊन चरख्यावर सूत कताईही केली. यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाले, की महात्मा गांधी यांची १५० वी जयंती देशभर साजरी केली जात आहे. वर्ध्यातील सेवाग्रामला मी माझा सन्मान समजतो. पवनार आश्रम तिर्थक्षेत्र आहेच त्याचबरोबर शांती, प्रेम, करूणा आणि न्यायाच प्रतिक आहे.