लग्न जुळत नसल्याने खेडमधील सख्ख्या बहिण-भावाने केली आत्महत्या

0
2175

खेड, दि. १८ (पीसीबी) – लग्न जुळत नसल्याच्या नैराश्यातून सख्ख्या बहिण-भावाने विषारी औषध पिऊन आणि ब्लेडने हाताच्या नसा कापून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (दि.१७) खेड तालुक्यातील डेरेवाडी येथे घडली.

रंजन गणपत भोपळे आणि शैला गणपत भोपळे असे आत्महत्या केलेल्या बहिण-भावाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रंजन आणि शैला दोघेही एकत्र राहत होते. तर त्यांची थोरली बहिण लक्ष्मीबाई कशाळे यादेखील त्याच गावात राहत होत्या. बुधवारी दुपारपर्यंत त्यांच्या घराचे दार बंदच होते. त्यामुळे लक्ष्मीबाई या पाहण्यासाठी गेल्या होत्या. बराच वेळ होऊनही त्यांनी काही प्रतिसाद नाही दिला. त्यामुळे लक्ष्मीबाईंनी दरवाजा ढकलून उघडला असता, दोघांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचे आढळले. तसेच, शैलाच्या हातावर ब्लेडने मारल्याच्या जखमाही आढळल्या. गावकऱ्यांनी लगेच दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मृत बहिण-भावाचे वय झाल्यानंतरही लग्न ठरत नव्हते, त्यामुळे दोघेही मागील काही दिवसांपासून नैराश्यात होते. याविषयी त्यांनी नातेवाईकांशीही चर्चा केली होती. परंतु अखेर त्यांनी आत्महत्या केली. खेड पोलीस अधिक तपास करत आहेत.