Videsh

लग्न करू नका आणि दीर्घायुषी व्हा; आजीबाईंनी सांगितले १०७ वयाचे रहस्य

By PCB Author

August 01, 2019

न्यूयॉर्क, दि. १ (पीसीबी) – ‘लग्न करू नका आणि दीर्घायुषी व्हा…’असा दीर्घायुष्याचा नवा मंत्र लुईस सिग्नोर (Louise signore) नामक एका महिलेने दिलाय. तुम्ही विचार करत असाल ही कोण महिला आहे आणि तिने असे का म्हटलेय, तर… ही लुईस सिग्नोर नामक महिला कोणी सेलिब्रिटी वगैरे नक्कीच नाही. न्यू-यॉर्कच्या ब्राँक्स येथे वास्तव्यास असलेली ही एक सामान्य महिला. एक दिवसापूर्वीच म्हणजे बुधवारी (दि.३०) या महिलेने आपला तब्बल १०७ वा जन्मदिन साजरा केला. त्यानिमित्ताने एका वृत्तवाहिनीने त्यांची मुलाखत घेतली आहे.

‘मी इतरांप्रमाणे व्यायाम करते, थोडाफार डान्स देखील करते आणि जेवण झाल्यावर ‘बिंगो’ नक्की खेळते. पण मी अजून लग्नच नाही केलंय, अद्यापही मी सिंगल आहे आणि खरंच मला असं वाटतं की लग्न न करणे हेच माझ्या दीर्घायुष्याचं खरं रहस्य असावं. मी पण लग्न केलं नसतं तर किती बरं झालं असतं, अशी माझी बहिण सतत मला म्हणत असते’, असं लुईस सिग्नोर वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाल्या. उल्लेखनीय म्हणजे त्यांच्या बहिणीनेही आजघडीला वयाची १०२ वर्षे ओलांडलीत.

सध्या, एलेलिया मर्फी (Alelia Murphy, वय ११४) यांना अमेरिकेतील सर्वात वृद्ध महिला म्हणून ओळखले जाते. मर्फी या न्यू-यॉर्कच्या हार्लेम या भागात राहतात. विशेष म्हणजे सिग्नोर यांचा जन्मही हार्लेम येथेच झाला आहे.