लग्नासाठी स्त्री-पुरुषांची किमाय वय वेगवेगळी नको, समान ठेवा – कायदा आयोग

0
794

नवी दिल्ली, दि. ३१ (पीसीबी) – लग्नासाठी तरुण आणि तरुणीचं किमान वय समान ठेवा, अशी सूचना कायदा आयोगाने केली आहे. पुरुषांसाठी लग्नाचं वय २१ वर्ष आणि महिलांसाठी १८ वर्ष हे चुकीचे असल्याचे कायदा आयोगाने म्हटले आहे. लग्नासाठी पुरुषाचं वय स्त्रीपेक्षा जास्त असावे, असा समज आहे. पंरतु कायदेशीररित्या प्रौढ होण्याची वयोमर्यात १८ वर्ष आहे. त्यामुळे विवाहासाठी स्त्री आणि पुरुषांसाठी वयोमर्यादा वेगवेगळी ठेवणं हे योग्य नाही, असे आयोगाने म्हटले आहे.

कायदा आगोयाने समान नागरिक हक्क आणि पर्सनल लॉमध्ये सुधारणा करण्याची सूचना केली आहे. अनेक लोकांशी चर्चा करुन कायदा आणि सामाजिक परिस्थितीच्या पुनरावलोकनच्या आधारावर कायदा आयोगाने म्हटले आहे की, सध्या देशात समान नागरी कायद्याची गरज नाही. सध्याच्या पर्सनल लॉमध्ये सुधारणा गरजेची आहे. मूलभूत अधिकार आणि धार्मिक स्वातंत्र्यामध्ये संतुलन हवं. कौटुंबिक मुद्द्यांशी संबंधित पर्सनल लॉमध्ये क्रमवार संग्रह करण्यावर विचार करावा, असे त्यांनी सांगितले.

सर्व समाजांमध्ये समानता आणण्याआधी एका समुदायामध्ये स्त्री-पुरुषांच्या अधिकारांमध्ये समानता आणण्याचा प्रयत्न व्हावा, असे कायदा आयोगाने म्हटले आहे.