Bhosari

लग्नाला नकार देणाऱ्या भोसरीतील अल्पवयीन मुलीला जीवे ठार मारण्याची धमकी

By PCB Author

October 27, 2018

भोसरी, दि. २७ (पीसीबी) – एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीकडे लग्नाची मागणी करत तिच्या अंगावर हात फिरवून शरीरसुखाची मागणी केली. तसेच लग्नाला नकार दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार भोसरी येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे.

युवराज निलकंठ चव्हाण (वय २९ रा. साईनाथ कॉलनी, नंबर.१ शास्त्री चौक, मुळ औसा) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पीडित मुलीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीला आरोपी गेल्या दोन महिन्यांपासून सतत त्रास देत होता. शुक्रवारी आरोपीने पीडितेचा हात धरूर तिच्या अंगावरून हात फिरवत शरीरसुखाची मागणी केली. तसेच तु माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुला जीवे ठार मारीन, अशी धमकी दिली. अधिक तपास भोसरी पोलीस करत आहे.