लग्नानंतर अवघ्या ११ दिवसात तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

0
459

हैदराबाद, दि.५ (पीसीबी) – लग्नानंतर अवघ्या ११ दिवसात तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी हैदराबादच्या सनातनगरमध्ये  घडली आहे.

पूर्णिमा (२२) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूर्णिमा आणि कार्तिकचे २२ नोव्हेंबरलाच लग्न झाले होते. कार्तिकचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. लग्न झाल्यापासून ते सनातनगरमध्ये राहत होते. मंगळवारी संध्याकाळी पूर्णिमाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कार्तिकनेच पोलिसांना पत्नीच्या आत्महत्येची माहिती दिली. पूर्णिमाने आत्महत्या करण्याआधी लिहिलेली एक चिठ्ठी सापडली आहे. त्यामध्ये तिने आत्महत्येचे इतके टोकाचे पाऊल का उचलले ? ते स्पष्ट केलेले नाही. पत्रामध्ये तिने आपल्या आई-वडिलांबद्दल लिहीले आहे. आई-वडिलांपासून लांब असल्याचे आज मला खूप वाईट वाटते. तिने आईला वडिलांची काळजी घ्यायला सांगितली आहे. पोलिसांनी प्रक्रियेनुसार कलम १७४ (संशयास्पद मृत्यू) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.