Pimpri

लग्नात मानपान केला नाही म्हणून विवाहितेचा छळ

By PCB Author

September 21, 2021

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – लग्नात मानपान केला नाही. लग्नात सोने दिले नाही, या कारणावरून सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. ही घटना 17 मे 2019 पासून वेळोवेळी घडली आहे.

याप्रकरणी 29 वर्षीय विवाहितेने सोमवारी (दि. 20) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पतीसह चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नात सोने दिले नाही. मानपान केला नाही. मुलगा दुबईला काम करतो त्याची कदर केली नाही असे म्हणून सासरच्या लोकांनी विवाहितेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. आरोपी पतीने विवाहितेच्या इच्छे विरुद्ध पॉर्न व्हिडीओ पाहून विवाहितेसोबत अनैसर्गिक संभोग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.