लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

0
365

खेड, दि. ७ (पीसीबी) – लग्नाचे आमिष दाखवून मित्राने तरुणीला पळवून नेले. तसेच लैंगिक अत्याचार करून तरुणीला गर्भवती केले. त्यानंतर लग्न न करता महिलेची फसवणूक केली. याप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या मित्राला अटक केली. ही घटना दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जून 2021 ते 4 ऑक्टोबर 2021 या कालावधीत घडली.

याप्रकरणी पीडित तरुणीने बुधवारी (दि. 6) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. साहिल काळुराम पवार (वय 20, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल पवार यांनी पीडित फिर्यादी महिलेशी मैत्री करून तिचा विश्वास संपादन केला. लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केले. तसेच फिर्यादीला लग्न करण्यासाठी पळवून नेले. परंतु लग्न न करता फिर्यादीची फसवणूक केली.

याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम ३७६(२)(एन), ३६६, ४२०, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा कलम ३(२)(v), ३ (२) (va), ३(१)(w)(i)(ii), 3(1)(r), 3(1)(s) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.