लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार

0
235

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत वारंवार लैंगिक संबंध ठेवले. त्यानंतर तरुणीला टाळून तिच्याशी लग्नास नकार दिला. याबाबत तरुणीने संबंधित व्यक्तीच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार 14 फेब्रुवारी 2018 ते 2 ऑगस्ट 2020 या कालावधीत घरकुल, चिखली आणि इतर ठिकाणी घडला.

याप्रकरणी पिडीत तरुणीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संतोष दगडू राक्षे (वय 40) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणी घराबाहेर भाजी खरेदी करण्यासाठी जात असताना त्यांची आरोपीसोबत ओळख झाली. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवले. यातूनच त्याने फिर्यादी यांची इच्छा नसताना देखील त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. फिर्यादी यांनी आरोपीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने त्याकडे दुर्लक्ष करून फिर्यादी यांच्यावर इतर ठिकाणी नेऊन वारंवार अत्याचार केला.

त्यानंतर आरोपी ‘मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही’ असे म्हणून फिर्यादी यांना टाळू लागला. फिर्यादी यांचा फोनही घेत नसल्याने फिर्यादी यांनी थेट पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.