लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

0
306

भोसरी, दि. १० (पीसीबी) – लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. ही घटना 9 ऑक्टोबर 2021 रोजी भोसरी परिसरात घडली असून याबाबत 9 जानेवारी 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रुचिर प्रमोद पेंढारकर (वय 29, रा. शेगाव, जि. बुलढाणा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 23 वर्षीय तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी सोबत प्रेमसंबंध प्रस्थापित केले. फिर्यादीला विश्वासात घेऊन आरोपीने त्यांना लग्नाचे आमिष दाखवले. त्यातून आरोपीने फिर्यादीच्या इच्छेविरोधात जबरदस्तीने वारंवार शरीर संभोग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.