Desh

लग्नाचं वचन देऊन केलेलं सेक्स म्हणजे बलात्कारच असं नाही – हायकोर्ट

By PCB Author

December 18, 2020

दिल्ली , दि. 18 (पीसीबी): दिल्ली उच्च न्यायालयाने एका महिलेची याचिका फेटाळली आहे ज्यामध्ये तिने लग्नाचं वचन देऊन बलात्कार करणाऱ्या व्यक्तीच्या सुटकेला आव्हान दिलं होतं… विवाहाचं वचन देऊन शरिरसंबंध ठेवणं म्हणजे बलात्कारच असं नाही असा निर्वाळा दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे.

महिलेने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालायने हा निष्कर्ष मांडला… सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालायने सांगितलं की, लग्नाचं वचन देऊन शरिरसंबध ठेवण्याला बलात्कार म्हटलं जाऊ शकत नाही, जर महिला दीर्घ काळापासून त्या व्यक्तीसोबत सतत शरिरसंबंध ठेवत असेल.

न्यायमूर्ती विभू बाखरु यांनी सांगितलं की, जर पीडिता काही क्षणात शरीरसंबंध ठेवण्यास तयार झाली असेल तर लग्नाचं अमिष दाखवून ते ठेवल्याचं आपण म्हणू शकतो.. तसंच काही प्रकरणांमध्ये महिलेची इच्छा नसतानाही लग्नाचं वचन महिलेला शरिरसंबंध ठेवण्यास प्रेरित करु शकतं असंही स्पष्ट केलं. 

न्यायालायने समजावून सांगितलं की, अशा प्रकरणांमध्ये लग्नाचं वचन देऊन बलात्कार केल्याचं आपण म्हणू शकतो. कलम ३७५ अंतर्गत बलात्काराच गुन्हा ठरु शकतो,पण जेव्हा दीर्घ काळासाठी शारिरीक संबंध ठेवले गेले असतील तेव्हा ते ऐच्छिक आणि लग्नाच्या हव्यासापोटी ठेवण्यात आल्याचं सिद्ध होतं.

न्यायमूर्ती विभू बाखरु यांनी यांनी यावेळी ट्रायल कोर्टाने दिलेला निर्णय कायम ठेवला. न्यायालयात महिलेच्या याचिकेवर सुनावणी सुरु होती ज्यामध्ये तिने आरोपीने आपली फसवणूक केली असून लग्नाचं खोटं वचन देऊन शारिरीक संबंध ठेवले आणि नंतर नंतर दुसऱ्या महिलेसाठी सोडून दिलं असा दावा केला होता. न्यायालायने यावेळी महिलेने आपल्या इच्छेने शारिरीक संबंध ठेवल्याचं स्पष्ट होत असल्याचं सांगितलं.