Notifications

लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर पाक समर्थकांनी केली दगडफेक

By PCB Author

September 04, 2019

लंडन, दि. ४ (पीसीबी) – जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याच्या कारणावरुन पाकिस्तानच्या लंडनमधील समर्थकांनी भारतीय उच्चायुक्तालयाच्या इमारतीवर दगडफेक केली. यामुळे उच्चायुक्तालयाच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. भारतीय उच्चायुक्तालयाने इमारत परिसरात झालेल्या हल्ल्याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली असून, फोटो शेअर केले आहेत.

भारतीय अधिकाऱ्यांनी लंडनच्या महापौरांकडे याबाबतची तक्रार देखील केली आहे. तसेच, निदर्शनकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानी समर्थकांनी या विरोध प्रदर्शनाला ‘काश्मीर फ्रीडम मार्च’ नाव दिले होते. पार्लमेंट स्क्वेअरपासून भारतीय उच्चायुक्तालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता.

याचे नेतृत्त्व युकेमधील लेबर पार्टीच्या काही खासदारांनी केले. मोठ्या संख्येने जमलेल्या पाकिस्तानी समर्थकांनी कलम ३७० हटवण्याविरोधात नारेबाजी करत दगडफेक केली. निदर्शनकर्त्यांच्या हातात पाकिस्तान अधिकृत काश्मीर(पीओके)चे झेंडे होते. तर काही वृत्त वाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार जवळपास दहा हजार पाकिस्तानी समर्थकांनी दगडफेक केली. यापूर्वी १५ ऑगस्ट रोजी देखील पाकिस्तानी समर्थकांनी लंडनमध्ये निदर्शने केली होती.

#WATCH United Kingdom: Pakistani supporters protested outside the Indian High Commission in London yesterday. They also caused damage to the premises. (Video Source: Indian High Commission in London) pic.twitter.com/dFtm7C64XO

— ANI (@ANI) September 4, 2019