Maharashtra

“रोहित पवार यांनी कोंबड्यांची पिल्लं, मासे आणि बियाणं विकून समाजकारण नाही तर धंदा केला”

By PCB Author

October 24, 2020

अहमदनगर,दि.२४(पीसीबी) – आमदार रोहित पवार कोंबड्यांची पिल्लं, मासे आणि बियाणं इथे आणून ते विकत असून समाजकारण नाही तर धंदा करण्यासाठी आले आहेत असं भाजप नेते राम शिंदे यांनी म्हटलं आहे. अहमदनगरला कर्जत येथे ते बोलत होते.

“मी केलेल्या कामांचं भूमिपूजन मंत्र्यांच्या हस्ते झालं असताना ते पुन्हा भूमिपूजन करत आहेत. तुकाई उपसा सिंचन योजनेसह अनेक कामं बंद पाडली,” अशी टीका राम शिंदे यांनी रोहित पवारांवर केला. “बारामती पॅटर्न सपशेल अपयशी ठरला असुन लोकांची घोर निराशा झाली आहे,”असंही ते म्हणाले.

दरम्यान नवीन पर्व असं काही नसून सगळं खोटं असल्याची टीकाही त्यांनी केली.