Maharashtra

रोहित पवारचे डिपॉझिट जप्त करून बदला घेतो – राम शिंदे

By PCB Author

September 30, 2019

अहमदनगर, दि. ३० (पीसीबी) –  भाजपचे दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांना बारामतीकरांनी आयुष्यभर त्रास दिला, त्याचा बदला मी रोहित पवार यांचे डिपॉझिट जप्त करून घेतो, असे भाजपचे मंत्री राम शिंदे यांनी  म्हटले आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू व जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार कर्जत जामखेडमधून विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. यावर रोहित पवार यांचे  डिपॉझिट जप्त करून बदला घेतो, असे राम शिंदे यांनी म्हटले आहे.

राम शिंदे बॅनरमंत्री आहेत, अशी टीका रोहित पवार यांनी केली होती. या टीकेचा शिंदे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. आम्ही कोट्यावधींची विकासकामे केली आहेत. पण आम्ही कधी जाहिरातबाजी केली नाही, असे उत्तर शिंदे यांनी दिले आहे.

दरम्यान, पुढील पाच वर्षांत कृष्णा भीमा स्थिरीकरण पाणी योजना आणून मतदारसंघ सुजलाम् सुफलाम् करणार आहे, असे आश्वासन राम शिंदे यांनी दिले आहे.