रोहितदादांना उमेदवारी द्या, १०० टक्के निवडून येतील; गावकऱ्यांची शरद पवारांकडे मागणी

0
525

अहमदनगर , दि. १३ (पीसीबी) – रोहित दादांना उमेदवारी द्या, ते १०० टक्के निवडून येतील,  अशी मागणी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील  गामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे.  यावर शरद पवार यांनी ‘तुझी मागणी झाली बघ’ असे रोहित पवार यांच्याकडे बघत सुचक टिप्पणी केली.

शरद पवार यांनी राज्याच्या दुष्काळी दौऱ्याला सुरुवात केली आहे. आज (सोमवार) ते अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत नातू आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवारही सोबत  आहेत.  यावेळी गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

सध्या कर्जत जामखेड मतदारसंघाचे भाजपचे कॅबिनेट मंत्री राम शिंदे   प्रतिनिधीत्व करत आहेत.  गावकऱ्यांच्या मागणीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसने रोहित पवार यांना उमेदवारी दिली, तर राम शिंदे विरुद्ध रोहित पवार अशी चुरशीची लढत होईल,  असे बोलले जात आहे.