रॉबिन्सन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित

0
446

लंडन, दि.०७ (पीसीबी) : कसोटी क्रिकेट पदार्पणात आपली छाप पाडणारा वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सन न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात खेळू शकणार नाही.

दोन वर्षांपूर्वी वर्णभेदी आणि अश्लिल ट्विट केल्याने रॉबिन्सन वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या प्रकरणाची चौकशी अजून चालू असल्यामुळे ती पूर्ण होईपर्यंत इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने त्याला सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित केले आहे. त्याला तातडीने इंग्लंड संघ सोडून जाण्यास सांगण्यात आले आहे. तो त्याचा कौंटी संघ ससेक्सकडून खेळू शकतो.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याला पदार्पणाची संधी मिळाली होती. गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर त्याने प्राभावी कामगिरी केली. मात्र, त्याने २०१२ आणि २०१३ मध्ये केलेली वर्णद्वेषी आणि अश्लिल ट्विट केले होते. त्याला पदार्पणाची संधी मिळाल्यावर सोशल मिडीयावर त्याने त्या वेळी केलेली ट्विट कुणीतरी पुन्हा व्हायरल केली. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत रॉबिन्सन आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही , असे ईसीबीने आपल्या पत्रकात म्हटले आहे.

ऑली रॉबिन्सन याने प्रत्येक मुस्लीम धर्मीय व्यक्ती या दहशतवादाशी जोडल्या गेलेल्या असतात आणि महिला, तसेच आशियाई व्यक्तींबद्दल त्याने अवमानकारक टिप्पणी ट्विटमधून केली होती. न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी बुधवारी खेळ सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघातील खेळाडू ‘एकतेसाठी एक क्षण’ हा संदेश पोचविण्यासाठी एकत्र उभे राहिले होते. त्या वेळी इंग्लंडच्या खेळाडूंनी ‘प्रत्येकासाठी क्रिकेट’असे लिहिलेले टी-शर्ट घातले होते. त्यानंतर खेळ सुरू होत नाही, तो रॉबिन्सन याने त्या वेळी केलेली ट्विट नव्याने व्हायरल झाली आणि चर्चेला उधाण आले. दिवसाचा खेळ संपल्यावर रॉबिन्सनने केलेल्या ट्विट प्रकरणी बिनशर्त माफी मागितली होती. त्या ट्विटबद्दल मला लाज आणि खेद वाटतो. मी वर्णद्वेषी नाही आणि सेक्सीही नाही.

सामना संपल्यावर रॉबिन्सनबाबत लगेच निर्णय जाहिर करण्यात आला. या विषयी कर्णधार ज्यो रुट याला विचारले असता, त्याने व्यक्तीगतरित्या माझा यावर विश्वास नाही. त्या दिवसानंतर रॉबिन्सनला झाल्या प्रकाराचा पश्चाताप होत होता आणि ते सहाजिक आहे. असो, त्याने या सगळ्याचा आपल्या खेळावर परिणाम होऊ दिला नाही. त्याने आंतरराष्ट्रीय दर्जाला आवश्यक असलेली गुणवत्ता आणि कौशल्य दाखवून दिले. तो कसोटी क्रिकेटमध्ये नक्कीच यशस्वी होईल, असे रुट म्हणाला.