‘रेशन दुकानदारांनी वेळेत व प्रत्येक कार्डधारकांना धान्य वाटपाची अंमलबजावणी करावी’

0
476

 

सोलापूर, दि.२ (पीसीबी) – संपूर्ण जगभरात कोरोना या विषाणूच्या प्रादूर्भावाने मोठया प्रमाणात जिवीतहानी होत आहे. त्यामुळे सरकारनेे या विषाणूचा प्रसार होऊ नये या कारणास्तव संपूर्ण महाराष्ट्र राज्यात संचारबंदी लागू केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने रेशनदुकानामध्ये नागरीकांना 2 ते 3 महिन्याचे अॅडवान्स धान्य वाटप करण्यात येत आहे.

त्याअनुशंगाने काल आमदार प्रणिती शिंदे यानी रेशन दुकानदारांची भेट घेवून प्रत्येक कार्डधारकांना वेळेत धान्य वाटपाची अंमलबजावणी करावी अशी सुचना दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनिल पेंटर, अ विभाग अध्यक्ष अभिजित, जिल्हा सचिव राज कमटम, जुबेर खानमियाँ, हर्षल गायकवाड व बहुसंख्य रेशनदुकानदार उपस्थित होते.

दरम्यान, राज्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत लाभार्थ्यांना तीन महिन्यांच्या कालावधीत मोफत तांदुळ वाटप केले जाणार आहे. राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून एप्रिल आणि मे सोबत जुन महिन्याचे धान्य देण्याचा आपण दि.१९ मार्चला निर्णय घेतला होता. दरम्यान केंद्रशासनाकडून दि.३० मार्च २०२० रोजी एप्रिल ते जुन २०२० दरम्यान नियमित धान्यासोबतच प्रति महिना प्रति व्यक्ती ५ किलो अतिरिक्त तांदुळ मोफत देण्याची अधिकृत सूचना प्राप्त झाली आहे.

तीन महिन्यांचा अन्नधान्य साठा आणि तीन महिन्यांचा मोफत तांदुळ एकत्रितपणे उपलब्ध करून दिल्यास शिधा वाटप दुकानांमध्ये साठवणुक करणे जिकीरीचे होईल ही बाब शिधा वाटप दुकानदार संघटनांकडून शासनाच्या निदर्शनास आणण्यात आली तसेच केंद्रसरकारने ३० मार्च रोजी मोफत तांदुळ देण्याच्या निर्णय घेतल्यामुळे दोन दिवसांत धान्याची वाहतूक करण्यासाठी मर्यादा असल्यामुळे त्या त्या महिन्यामध्ये,त्या महिन्याचे धान्य वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.