Maharashtra

‘रेव्ह पार्टी’च्या आयोजकाचा डाव उधळला, पोलिसांनी केली अटक

By PCB Author

December 31, 2020

मुंबई, दि.३१ (पीसीबी) : २०२० या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ‘रेव्ह पार्टी’च्या तयारीत असलेल्या एका आयोजकाला नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने ठाण्यातून अटक केली आहे. त्याच्याकडून चरस व गांजा या सारखे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून अशरफ मुस्तफा शहा (रा. वागळे स्ट्रीट, ठाणे ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी नवीन वर्षापूर्वी रेव्ह पार्टी आयोजित करणार असल्याची माहिती अधिकारी समीर वानखेडे यांना मिळाली होती. रेव्ह पार्टीसाठी त्याने मोठ्या प्रमाणात ड्रग्जची व्यवस्था सुद्धा केली होती. या माहितीच्या आधारे ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील मुलुंड चेक नाकाजवळ सापळा रचून पोलिसांनी आरोपीस अटक केली.

दरम्यान त्याच्याकडून 4 किलो चरस आणि 11 किलो गांजा सापडला असून तो जप्त करण्यात आला आहे. एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले की, आरोपी शहा थर्टी फर्स्टसाठी रेव्ह पार्टी आयोजित करणार होता आणि या पार्टीमध्ये तो या ड्रग्जची विक्री करणार होता.