रेल्वे प्रवाश्यांसाठी महत्वाची बातमी. ‘1 नोव्हेंबरपासून’ रेल्वेगाड्यांचं वेळापत्रक बदलणार; जाणून घ्या काय होणार बदल

0
295

नवी दिल्ली,दि.२९(पीसीबी) : भारतीय रेल्वे देशभरातील गाड्यांचे वेळापत्रक बदलणार आहे. यापूर्वी 1 ऑक्टोबरपासून गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात येणार होते, परंतु काही कारणांमुळे 31 ऑक्टोबर रोजी ते अंतिम करण्यात आले. या तारखेनंतर म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून नवीन वेळापत्रक लागू केले जाईल. यानंतर 13 हजार प्रवासी गाड्यांच्या वेळा बदलतील. 1 नोव्हेंबरपासून देशात चालणार्‍या जवळपास 30 राजधानी गाड्यांची वेळही बदलणार आहे.

तेजस एक्सप्रेस चंदीगड ते नवी दिल्लीदरम्यान धावणार
तेजस एक्स्प्रेस 1 नोव्हेंबरवगळता प्रत्येक बुधवारी चंदीगड ते नवी दिल्लीकडे धावेल. ट्रेन क्रमांक 22425 नवी दिल्ली-चंदीगड तेजस एक्सप्रेस दर सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवारी रविवारी सकाळी 9.40 वाजता नवी दिल्ली रेल्वे स्थानकातून सुटेल आणि चंदीगड रेल्वे स्थानकात दुपारी 12.40 वाजता पोहोचेल. त्याचप्रमाणे 22426 चंदीगड – नवी दिल्ली तेजस एक्स्प्रेस देखील चंदीगड रेल्वे स्थानकातून त्याच दिवशी दुपारी 2.35 वाजता धावेल आणि सायंकाळी 5.30 वाजता नवी दिल्ली रेल्वे स्थानकात पोहोचेल.

MSP योजना केरळमध्ये लागू होणार
केरळ सरकारने भाज्यांचे आधारभूत मूल्य निश्चित केले आहे. यासह भाजीपाला किमान आधारभूत किंमत (MSP) निश्चित करणारे केरळ हे देशातील पहिले राज्य बनले आहे. भाजीपाल्याची ही किमान किंवा आधारभूत किंमत उत्पादन खर्चापेक्षा 20 टक्के जास्त असेल. राज्याचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले की, ही योजना 1 नोव्हेंबरपासून लागू केली जाईल.