रेल्वेत चोरी करणाऱ्या चार सराईतांना पुणे लोहमार्ग पोलिसांनी केले जेरबंद

0
939

पुणे, दि. २२ (पीसीबी) – गर्दीचा आणि झोपेचा फायदा घेऊन रेल्वेमध्ये चोऱ्या करणाऱ्या चार जणांच्या टोळीला लोहमार्ग पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले आहे. ही कारवाई पुणे रेल्वे स्थानकावर हावडा पुणे एक्सप्रेसच्या जनरल डब्यात करण्यात आली.

विकी बबनराव लांडगे (वय २१) ,राहुल राजू शिंदे (वय १९), अशोक बाबू लहाने (वय २२) दीपक भगवान खाजेकर (वय ३०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पुणे लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोपरगावहून येवून काही चोरटे अहमदनगर, दौंड आणि पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे मोबाईल, बॅग चोऱ्या करत असल्याची माहिती एका खबऱ्याकडून पुणे लोहमार्ग गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल दबडे यांना मिळाली होती. त्यानुसार दबडे यांनी त्यांच्या स्टाफसह सापळा रचून पुणे रेल्वे स्थानकावर हावडा पुणे एक्सप्रेसच्या जनरल डब्यातून चारही सराईत चोरांना अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून तब्बल १७ मोबाईल व ५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन असा एकूण १ लाख ३४ हजार ९०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल दबडे, पोलीस उपनिरीक्षक बबन गायकवाड, पोलीस हवालदार अनिल दांगट, अमरदीप साळुंखे, संतोष चांदणे, जनार्धन गर्जे, निलेश बिडकर, राकेश कोकाटे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, पवन बोराटे, संदीप पवार, भिसे, गाडे, जगदीश सावंत आणि  हवालदार खोत यांच्या पथकाने  केली.