रेमडेसेवीरच्या नावाखाली इंजेक्शनमधून द्यायचे पाणी; आणि चौकशीअखेर जी माहिती समोर आली ‘ती’ धक्कादायक होती

0
288

उत्तरप्रदेश, दि.३० (पीसीबी) : पोलिस चौकशीत या चौघांनी धक्कादायक खुलासे केले. त्याचवेळी सर्व आरोपी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. हि माहिती मिळताच पोलिस अधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला आणि पोलिसांनी लगोलग स्वतःला होम आयसोलेट केले.

पोलिसांनी चौकशी केली असता आरोपींनी कबुली दिली कि, ‘कोरोनाची दुसरी लाट येताच त्यांनी इंजेक्शन आणि ब्लॅक मार्केटींग सुरू केले. त्यांनी 22 दिवसात 34 इंजेक्शन्सचा काळाबाजार केला होता. नुकतीच कांठ रोड येथील रुग्णालयात मृत्यू झालेल्या व्यक्तीला दोन इंजेक्शन्स चोरून 75 हजार रुपयांना विकली होती. पोलिस चौकशीत चौघांनी हेही कबूल केले की, सोशल मीडिया ग्रुप रेमेडीसवीर इंजेक्शन शोधणार्‍या लोकांचे मोबाइल नंबर गोळा करत असत. त्यानंतर ते इंटरनेट कॉलिंगद्वारे त्यांच्याशी संपर्क साधत असत. चर्चा झाल्यावर त्यांनी लोकांना इंजेक्शन दिले. लखनऊच्या आलम बाग, मेरठ आणि बिजनौरच्या रुग्णांनाही महागड्या किंमतीत इंजेक्शन्स देण्यात आल्याचंही चौकशीत समोर आलं आहे.

पोलिस चौकशीत त्यांनी हे हि सांगितले की, इंटरनेटद्वारे गरजूंना कॉल करण्यात आले. पोलिसांपासून स्वतःला वाचवायला रुग्णाच्या कुटुंबियांनी खात्यात पैसे पाठ्वल्यावरच इंजेक्शन्स पाठविली जात होती. या टोळीत सामील झालेले हे सारे लोक आपापसात इंटरनेट कॉलिंग संभाषणासाठी वापरत असत.