रेड बुल या कंपनीत काम लावून देण्याचे आमिष दाखवून वाकडमधील तरुणीला सव्वा लाखांचा गंडा

0
597

चिंचवड, दि. १५ (पीसीबी) – रेड बुल या शितपेय बनवणाऱ्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तिघा जणांनी वेगवेगळ्या क्रमांकावरुन फोन करत एका २४ वर्षीय तरुणीला तीचे बँकेची माहिती घेऊन १ लाख १५ हजार ४५९ रुपयांचा गंडा घातला. ही घटना १ मार्च २०१९ ते ४ मार्च २०१९ दरम्यान घडली.

याप्रकरणी २४ वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तिघा जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार १ मार्च ते ४ मार्च २०१९ या कालावधीत वाकड येथे राहणाऱ्या एका २४ वर्षीय महिलेला राजीव दिक्षीत, श्रीनिवास राव आणि एका अज्ञात महिलेने पाच वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरुन फोन करुन रेड बुल इंडिया प्रा. लि. या कंपनीत काम लावण्याचे आमिष दाखवत त्यांच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या बँक खात्याची माहिती घेऊन बँक खात्यातील १ लाख १५ हजार ४५९ रुपयांची रक्कम काढून घेत फसवणुक केली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) ज्ञानेश्वर साबळे तपास करत आहेत.