Bhosari

रेंट अॅग्रीमेंटची कॉपी घेण्याच्या बहाण्याने आलेल्या तरुणाने केला घरमालकाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग

By PCB Author

May 08, 2022

भोसरी, दि. ८(पीसीबी) -रेंट अॅग्रीमेंटची कॉपी घेण्याच्या बहाण्याने घरमालकाच्या घरी आलेल्या तरुणाने घरमालकाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि. 7) दुपारी भोसरी येथे घडली.

उस्मान गुलाम खान (वय 21, रा. भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला शनिवारी कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांची 15 वर्षीय मुलगी एकटी घरी होती. आरोपी रेंट अॅग्रीमेंटची कॉपी घेण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांच्या घरी आला. त्याने मुलगी एकटी असल्याचे पाहिले आणि तिच्यासोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.