रुपयाला चहा तरी भेटतो का? अजित पवारांचा शिवसेनेला टोला

0
455

मुंबई, दि. १४ (पीसीबी) –  शिवसेनेने आपल्या वचननाम्यात  १० रुपयांत पोटभर जेवण आणि १ रुपयांत आरोग्य चाचणी, अशा घोषणा  केल्या आहेत.  या घोषणाची माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी खिल्ली उडवली आहे. जनतेला किती खोटी आश्वासने द्याल. रुपयाला चहा तरी भेटतो का?, अशी टीका पवार यांनी केली आहे.

पवार म्हणाले की, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस पाडला आहे.   त्यांनी १० रुपयांत पोटभर जेवण आणि १ रुपयांत आरोग्य चाचणी, शेतकऱ्यांना दरवर्षी १० हजार रूपये देणार,  अशा घोषणा केल्या आहेत. पण खोटे बोलायची काही सीमा असते, असे पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मनगुंटीवर यांनी १० रूपयांत थाळी देण्यापेक्षा जनतेची क्रयशक्ती कशी वाढेल, ते पाहाणे गरजेचे आहे,  असे म्हटले आहे. तसेच  शिवसेनेच्या १० रूपयांत जेवणाची थाळी देण्याच्या आश्वासनावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही टीकेची झोड उठवली आहे. सरकार चालविणार का, स्वयंपाक करणार ? असा टोला लगावला आहे.