रिया चक्रवर्तीच्या सोशल मीडियावरील एका पोस्टने खळबळ. बलात्कार करण्याची आणि जीवेमारण्याची धमकी

0
272

मुंबई, दि. १६ (पीसीबी) : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी पोलीस चौकशी करत आहे. परंतु, आता याप्रकरणात सोशल मीडियावर सुशांतशी निगडीत लोकांना नेटकऱ्यांच्या टिकेचा सामना करावा लागत आहे. रिया चक्रवर्तीने सोशल मीडियावर एक पोस्ट करत दिला मिळणाऱ्या धमक्यांबाबत माहिती दिली. रियाने पोस्ट करत तिला बलात्कार करण्याची आणि जीवेमारण्याची धमकी देण्यात येत असल्याचं सांगितलं.

रिया चक्रवर्तीने सोशल मीडियावर पोस्ट करत आरोप लावले आहेत की, तिला बलात्कार करण्याची आणि जीवेमारण्याची धमकी दिली जात आहे. ही धमकी @mannu_raaut नावाच्या अकाउंटवरून देण्यात येत आहे. रिया चक्रवर्तीचं म्हणणं आहे की, तिला याआधी अनेक शिव्या देण्यात आल्या, तिला खूनीही म्हटलं गेलं. ती शांत बसली. परंतु, आता बलात्कार आणि जीवेमारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. तसेच तिला आत्महत्या करण्यासही सांगण्यात येत आहे. त्यामुळेच तिने सायबर सेलमध्ये यासंदर्भात तक्रार केली असून पोलिसांकडेही मदत मागितली आहे.

रियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत म्हटलं आहे की, ‘मी आत्महत्या केली नाहीतर माझ्यावर बलात्कार करण्यात येईल आणि माझी हत्या करण्यात येईल. परंतु, मानु राऊत तुला जराही जाणीव आहे की, तू किती गंभीर गोष्ट म्हणाली आहेस. हादेखील गुन्हा आहे. कायद्यानुसार, कोणालाही हे करण्याचा अधिकार नाही. अशाप्रकराचं शोषण आता सहन नाही केलं जाऊ शकत. आता खूप झालं.’

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्तीची देखील पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. रियाने याप्रकरणी पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला आहे. त्यानंतर आता सुशांतच्या मृत्यूच्या एका महिन्यानंतर रियाने सोशल मीडियावर त्याच्या आठवणींना उजाळा देत एक भावुक पोस्ट लिहिली आहे.

रिया चक्रवर्तीची इमोशनल इन्स्टाग्राम पोस्ट
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला आज एक महिना पूर्ण झाला आहे. अशातच त्याची मैत्रिण आणि कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने सुशांतशी निगडीत आठवळींना पोस्ट करत उजाळा दिला आहे. रियाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘मी आताही माझ्या भावनांचा सामना करण्यासाठी संघर्ष करत आहे. तूच तो व्यक्ती आहेस, ज्याने मला प्रेमात विश्वास दिला आणि प्रेमाची जाणिव करून दिलीस. तूच मला शिकवलसं की, कसं एखादं सोप समीकरण जीवनाचा अर्थ शिकवू शकतं. मी तुला वचन देते की, मी तुझ्याकडून प्रत्येक दिवस शिकली आहे. मला माहिती आहे की, तू सध्या अत्यंत शांतिपूर्ण जागेवर आहेस. चंद्र, तारे, गॅलेक्सी या सर्वांनी मोकळ्या मनाने एका भौतिकशात्र तज्ज्ञाचं स्वागत केलं असणार. तू स्वतः एक तारा बनला आहेस. मी आता त्या तुटणाऱ्या ताऱ्याची वाट पाहणार, आणि हे मागणार की, तू माझ्याकडे पुन्हा यावं. तू एक उत्तम व्यक्तीमत्त्व असणारा व्यक्ती होतास, ज्याला संपूर्ण जगाने पाहिलं आहे. मी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी असमर्थ आहे आणि तू सुद्धा हेच सांगायचास की, आपलं प्रेम वेगळं आहे. तू सारं काही मोकळ्या मनाने करू शकतेस. आणि आता तू हेसुद्धा दाखवून दिलसं की, आपलं प्रेम एक इतरांसाठी उदाहरण आहे. तुला शांती मिळो सुशी, तुला गमावून आज 30 दिवस पूर्ण झाले आहेत. परंतु, मी आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करीन.’