Maharashtra

रिपब्लिकन जनशक्तीला सत्तेत वाटा देण्यासाठी प्रयत्नशील – निलम गोऱ्हे

By PCB Author

August 31, 2019

पुणे, दि. ३१ (पीसीबी) –  बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवशक्ती -भीमशक्ती संकल्पनेला बळ देणारे  आंबेडकरी चळवळीचे नेते ,साहित्यिक अर्जुन डांगळे यांच्या रिपब्लिकन जनशक्तीला येत्या विधानसभा निवडणुकीत आणि सत्तेत सहभागी करण्यासाठी आग्रह धरणार आहे, अशी ग्वाही विधान परीषदेच्या उपसभापती व शिवसेनेच्या उपनेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिली.

आज (शनिवार) जनशक्तीच्या कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती पदी निवड झाल्याबद्दल जनशक्तीच्या वतीने डॉ.निलम गोऱ्हे यांचा नागरी सत्कार अर्जुन डांगळे यांच्या हस्ते करण्यात आला.  यावेळी रिपब्लिकन जनशक्ती चे प्रदेश अध्यक्ष शैलेंद्र मोरे उपस्थित होते .  या सत्काराला उत्तर देताना गोऱ्हे बोलत होते.

पुढे त्या म्हणाल्या, की मागासवर्गीय महामंडळ मधून महिलांसाठी स्वतंत्र योजना सुरू करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. या बरोबरच दलित महिलांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी मी सदैव कार्यरत असेल.

रिपब्लिकन जनशक्ती चे संस्थापक अर्जुन डांगळे म्हणाले की,  येत्या विधानसभा निवणुकीत सेनेने आमच्या पक्षला  श्रीरामपूर, धारावी, देवळाली, फलटण आणि भोर   हे पाच मतदार संघ द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.