Maharashtra

रितेश देशमुख म्हणतात, ‘या’ नेत्यांना करा काँग्रेसचे अध्यक्ष

By PCB Author

August 11, 2019

मुंबई, दि. ११ (पीसीबी) –  राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट किंवा युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना काँग्रेसचे अध्यक्ष करण्यात यावे, अशी मागणी अभिनेता रितेश देशमुख यांनी ट्विट करून  केली आहे.   

ज्योतिरादित्य शिंदे हे मध्यप्रदेशामधील काँग्रेसचे वजनदार नेते आहेत. ते पक्षाचे सरचिटणीसही आहेत. तर सचिन पायलट हे राजस्थानचे उपमुख्यमंत्री आहेत.

राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्ष कोण होणार याबाबत एकमत होत नाही. सध्या सोनिया गांधी यांच्याकडे काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष  म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

दरम्यान, सचिन पायलट, ज्योतिरादित्य शिंदे या दोघांपैकी एकाला काँग्रेसचे अध्यक्षपद देण्यात यावे, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनीही केली होती.